Karaoke Sarayu Tiravari Ayodhya Sudhir Phadake Karaoke

Karaoke Sarayu Tiravari Ayodhya Sudhir Phadake Karaoke

1,500.00

अयोध्या मनुनिर्मित नगरी
सरयू तीरावरी अयोध्या मनुनिर्मित नगरी
अयोध्या मनुनिर्मित नगरी
अयोध्या मनुनिर्मित नगरी

  • Description
  • Additional information
  • Reviews (0)
  • Marathi lyrics

Description

सरयू तीरावरी अयोध्या मनुनिर्मित नगरी
अयोध्या मनुनिर्मित नगरी
सरयू तीरावरी अयोध्या मनुनिर्मित नगरी
अयोध्या मनुनिर्मित नगरी
अयोध्या मनुनिर्मित नगरी

त्या नगरीच्या विशालतेवर
उभ्या राहिल्या वास्तू सुंदर
मधुन वाहती मार्ग समांतर
रथ, वाजी, गज, पथिक चालती,
नटुनी त्यांच्यावरी
ओ नटुनी त्यांच्यावरी
अयोध्या मनुनिर्मित नगरी

घराघरावर रत्‍नतोरणें
अवती भंवती रम्य उपवनें
त्यांत रंगती नृत्य गायनें
त्यांत रंगती नृत्य गायनें
मृदंग वीणा नित्य नादती,
अलका नगरीपरी
ओ अलका नगरीपरी
अयोध्या मनुनिर्मित नगरी
अयोध्या मनुनिर्मित नगरी

स्त्रिया पतिव्रता, पुरुषहि धार्मिक
पुत्र उपजती निजकुल दीपक
नृसंस ना कुणि, कुणि ना नास्तिक
अतृप्तीचा कुठें न वावर,
नगरिं, घरीं, अंतरीं
ओ नगरिं, घरीं, अंतरीं
अयोध्या मनुनिर्मित नगरी
अयोध्या मनुनिर्मित नगरी

इक्ष्वाकू-कुल-कीर्ती-भूषण
राजा दशरथ धर्मपरायण
त्या नगरीचें करितो रक्षण
त्या नगरीचें करितो रक्षण
गृहीं चंद्रसा, नगरिं इंद्रसा,
गृहीं चंद्रसा, नगरिं इंद्रसा,
सूर्य जसा संगरी
ओ सूर्य जसा संगरी
अयोध्या मनुनिर्मित नगरी

दशरथास त्या तीघी भार्या
सुवंशजा त्या सुमुखी आर्या
दशरथास त्या तीघी भार्या
सुवंशजा त्या सुमुखी आर्या
सिद्ध पतीच्या सेवाकार्या
बहुश्रुता त्या रूपशालिनी,
अतुलप्रभा सुंदरी
ओ अतुलप्रभा सुंदरी
अयोध्या मनुनिर्मित नगरी
अयोध्या मनुनिर्मित नगरी

तिघी स्त्रियांच्या प्रीतिसंगमीं
तिन्ही लोकिंचें सुख ये धामीं
तिघी स्त्रियांच्या प्रीतिसंगमीं
तिन्ही लोकिंचें सुख ये धामीं
एक उणें पण गृहस्थाश्रमीं
एक उणें पण गृहस्थाश्रमीं
पुत्रोदय पण अजुनी नव्हता,
प्रीतीच्या अंबरी
ओ प्रीतीच्या अंबरी
अयोध्या मनुनिर्मित नगरी
अयोध्या मनुनिर्मित नगरी

शल्य एक तें कौसल्येसी
दिसे सुमित्रा सदा उदासी
कैक कैकयी करी नवसासी
कैक कैकयी करी नवसासी
दशरथासही व्यथा एक ती,
छळिते अभ्यंतरी
ओ छळिते अभ्यंतरी
अयोध्या मनुनिर्मित नगरी
अयोध्या मनुनिर्मित नगरी

राजसौख्य तें सौख्य जनांचें
एकच चिंतन लक्ष मनांचें
राजसौख्य तें सौख्य जनांचें
एकच चिंतन लक्ष मनांचें
काय काज या सौख्य धनाचें
कल्पतरूला फूल नसे कां,
कल्पतरूला फूल नसे कां,
वसंत सरला तरी
ओ वसंत सरला तरी
अयोध्या मनुनिर्मित नगरी
अयोध्या मनुनिर्मित नगरी

Additional information

Singer

Music Company

HMV

Reviews

There are no reviews yet.


Only logged in customers who have purchased this product may leave a review.

सरयू तीरावरी अयोध्या... मनुनिर्मित नगरी
अयोध्या मनुनिर्मित नगरी
सरयू तीरावरी अयोध्या मनुनिर्मित नगरी
अयोध्या मनुनिर्मित नगरी
अयोध्या मनुनिर्मित नगरी

त्या नगरीच्या विशालतेवर
उभ्या राहिल्या वास्तू सुंदर
मधुन वाहती मार्ग समांतर
रथ, वाजी, गज, पथिक चालती,
नटुनी त्यांच्यावरी
ओ ...नटुनी त्यांच्यावरी
अयोध्या मनुनिर्मित नगरी

घराघरावर रत्‍नतोरणें
अवती भंवती रम्य उपवनें
त्यांत रंगती नृत्य गायनें
त्यांत रंगती नृत्य गायनें
मृदंग वीणा नित्य नादती,
अलका नगरीपरी
ओ....अलका नगरीपरी
अयोध्या मनुनिर्मित नगरी
अयोध्या मनुनिर्मित नगरी

स्त्रिया पतिव्रता, पुरुषहि धार्मिक
पुत्र उपजती निजकुल दीपक
नृसंस ना कुणि, कुणि ना नास्तिक
अतृप्तीचा कुठें न वावर,
नगरिं, घरीं, अंतरीं
ओ....नगरिं, घरीं, अंतरीं
अयोध्या मनुनिर्मित नगरी
अयोध्या मनुनिर्मित नगरी

इक्ष्वाकू-कुल-कीर्ती-भूषण
राजा दशरथ धर्मपरायण
त्या नगरीचें करितो रक्षण
त्या नगरीचें करितो रक्षण
गृहीं चंद्रसा, नगरिं इंद्रसा,
गृहीं चंद्रसा, नगरिं इंद्रसा,
सूर्य जसा संगरी
ओ....सूर्य जसा संगरी
अयोध्या मनुनिर्मित नगरी

दशरथास त्या तीघी भार्या
सुवंशजा त्या सुमुखी आर्या
दशरथास त्या तीघी भार्या
सुवंशजा त्या सुमुखी आर्या
सिद्ध पतीच्या सेवाकार्या
बहुश्रुता त्या रूपशालिनी,
अतुलप्रभा सुंदरी
ओ...अतुलप्रभा सुंदरी
अयोध्या मनुनिर्मित नगरी
अयोध्या मनुनिर्मित नगरी

तिघी स्त्रियांच्या प्रीतिसंगमीं
तिन्ही लोकिंचें सुख ये धामीं
तिघी स्त्रियांच्या प्रीतिसंगमीं
तिन्ही लोकिंचें सुख ये धामीं
एक उणें पण गृहस्थाश्रमीं
एक उणें पण गृहस्थाश्रमीं
पुत्रोदय पण अजुनी नव्हता,
प्रीतीच्या अंबरी
ओ....प्रीतीच्या अंबरी
अयोध्या मनुनिर्मित नगरी
अयोध्या मनुनिर्मित नगरी

शल्य एक तें कौसल्येसी
दिसे सुमित्रा सदा उदासी
कैक कैकयी करी नवसासी
कैक कैकयी करी नवसासी
दशरथासही व्यथा एक ती,
छळिते अभ्यंतरी
ओ....छळिते अभ्यंतरी
अयोध्या मनुनिर्मित नगरी
अयोध्या मनुनिर्मित नगरी

राजसौख्य तें सौख्य जनांचें
एकच चिंतन लक्ष मनांचें
राजसौख्य तें सौख्य जनांचें
एकच चिंतन लक्ष मनांचें
काय काज या सौख्य धनाचें
कल्पतरूला फूल नसे कां,
कल्पतरूला फूल नसे कां,
वसंत सरला तरी
ओ....वसंत सरला तरी
अयोध्या मनुनिर्मित नगरी
अयोध्या मनुनिर्मित नगरी